महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंचवडमध्ये आमदार-खासदारांमध्ये लांडगे एकमेव पदवीधर मतदार - pimpri chinchwad politics news

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

महेश लांडगे
महेश लांडगे

By

Published : Dec 1, 2020, 6:01 PM IST

पुणे -पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार विलास लांडे यांच्याशी संबंधित असलेल्या लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

शांततेत मतदान

मंगळवारी सकाळी या निवडणुकीसाठी शांततेत मतदानाला सुरूवात झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १८ ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये अनुक्रमे संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

येत्या ३ डिसेंबरला होणार निकाल जाहीर

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. पदवीधरसाठी पुणे विभागात ४ लाख ३२ हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७४ हजार ८६० इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण १ हजार २०२ मतदान केंद्र आहेत. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details