बळीराजासाठी खूश खबर, येत्या ३ ते ४ दिवसात चांगला पाऊस - Pune Observatory
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. मात्र, काही भागात आजून पाऊस बरसलेला नाही. मात्र,३ ते ४ दिवसात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
![बळीराजासाठी खूश खबर, येत्या ३ ते ४ दिवसात चांगला पाऊस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3866747-145-3866747-1563366650555.jpg)
बळीराजासाठी खूश खबर, येत्या ३ ते ४ दिवसात चांगला पाऊस
पुणे - राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने चित्र आहे शेतकरीवर्ग डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहतो आहे. या शेतकऱ्याना हवामान विभागाकडून दिलासा देणारी बातमी देण्यात आली आहे. येत्या तीन ते चार दिवसात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
बळीराजासाठी खूश खबर, येत्या ३ ते ४ दिवसात चांगला पाऊस