पुणे - पुणेकरांना मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. (Income Tax and Entertainment Tax no Increase Decision For PMC) मागील वर्षातील दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मल्टिस्पेशालिटी आणि कर्करोगाच्या रुग्णालयांच्या प्रस्तावाला मान्यता
बाणेर येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय आणि वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. खासगी संस्थांच्या सहकार्यातून डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर उभारण्यात येणार आहेत. (Income Tax no Increase Decision For PMC) पीएमपीएमएलची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना वेतन मिळणार आहे. हे वेतन देता यावे यासाठी दरमहा सहा कोटी रुपये पुढील वर्षीच्या संचलन तुटीमधून अग्रीम स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा -आरोग्य मंत्री टोपे म्हणाले - 'या' महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता