महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nanded-Pune Express : मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नांदेड-पुणे एक्सप्रेस आता रोज धावणार - pune last halt

आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस ( Nanded-Pune Express ) आता रोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील प्रवाशांचा नांदेड-पुणे प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

Nanded Pune Express
नांदेड पुणे

By

Published : Jul 2, 2022, 11:16 AM IST

पुणे -मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी ( Good news ) आहे. कारण आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस ( Nanded-Pune Express ) आता रोज धावणार आहे. मराठवाडा ( Marathwada ) विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ( Railway Ministry ) गाडी क्रमांक 12730/12729 द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील प्रवाशांचा नांदेड-पुणे प्रवास आणखी सुखकर होणार आहे. त्याशिवाय रोजच होणार आहे.

हडपसर ऐवजी थेट पुणे - महत्त्वाची बाब म्हणजे, या वाढवलेल्या रेल्वे आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचून पुण्याहून सुटणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे आमि सोपे होईल. 5 जुलैपासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु होणार आहे. परिणामी ही रेल्वे 5 जुलैपासून सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. रेल्वेच्या क्रमांकात काही बदल करण्यात आले आहेत. या गाडीचा 12730/12729 हा क्रमांक बदलून 17630/17629 असा करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळेत धावणार - या रेल्वेची पहिली उद्घाटन फेरी दिनांक 4 जुलै 2022 रोजी जालना येथून होणार आहे. पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे गतस्थानक बदलून आता ते पुणे करण्यात आले ( pune last halt ) आहे. यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर होईल. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रीचा वेळ या रेल्वेंना देण्यात आल्या ( train will run at night ) आहे. प्रवासांच्या सोयींना प्राधान्य देऊन त्यांच्या वेळेनुसार ही रेल्वे गाडी चालवली जात आहे. जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील.

रेल्वेच्या वेळा - गाडी क्रमांक 17630 नांदेड - पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 17629 पुणे - नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री 21.35 वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी 10.20 वाजता पोहोचेल.

हेही वाचा -Shridhar Patankar relief : श्रीधर पाटणकर यांना सीबीआय कोर्टाचा मोठा दिलासा, फसवणूक प्रकरणी तपास बंद करण्याची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details