महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्याच्या ऐतिहासिक भिडे वाड्यात पुन्हा सुरू होणार मुलींची शाळा - छगन भुजबळ

पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार आहे. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Girls' school  in Bhidewada pune
Girls' school in Bhidewada pune

By

Published : Nov 27, 2021, 8:16 PM IST

पुणे - शहरातील भिडेवाडा येथे 1948 साली महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, ज्येष्ठ अभ्यासक हरि नरके व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
याच जागेवर मुलींची शाळा सुरु करणे हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली -
यावेळी भुजबळ म्हणाले, भिडे वाड्यामध्ये पुन्हा मुलींची शाळा सुरू करण्यात येणार आहे. ही शाळा महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. जवळपास आठ हजार स्क्वेअर फूट जागा शाळेसाठी उपलब्ध होणार आहे. याच जागेवर मुलींची शाळा सुरु करणे हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. मात्र या वाड्याच्या तळ मजल्यावर सध्या दुकाने आहेत. सध्या ही जागा एका बँकेच्या ताब्यात आहे. बँक आणि मूळ मालक यांच्यामध्ये सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. बँकेचे अधिकारी आणि मूळ मालक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल आणि न्यायालयातील वाद संपेल अशी अपेक्षा आहे.
सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी होणार अनावरण -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या परवानग्या न मिळाल्यामुळे रखडला होता. मात्र तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्यात येणार आहे. तशा सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details