पुणे - फिल्म अॅण्ड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)FTII Girl Student Suicide मध्ये मागच्या महिन्यातच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. एफटीआयआय शिक्षण घेणार्या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुलीचा मृतदेह हा सध्या शवविच्छदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विद्यार्थीनेीचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. त्या विद्यार्थीने आत्महत्याच केल्याचे या रिपोर्टमधून स्पष्ट करण्यात आले आहे.
महिनाभरातच दुसरी घटनाकामाक्षी ही मुळची नैनिताल उत्तराखंड येथील राहणारी आहे. 2019 पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अॅक्टींग या कोर्सचे शिक्षण घेत होती. ती एकटीच खोलीत राहत होती. तसेच फारशी ती कोणात मिसळत नव्हती. दरम्यान, गुरुवारी कामाक्षी क्लासमध्ये न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थीनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील महीन्यात 5 ऑगस्ट रोजी येथील हॉस्टेलमध्ये एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर महिनाभरातच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.