पुणे - शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर बेपत्ता होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. आर्थिक अडचणीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने सर्व शक्यता नाकारल्या आहेत. आम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत नसून 150 कोटी रुपयांचे कर्जही फेडून टाकल्याचे कपिल यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला असून त्यांची नावेही पोलिसांना दिल्याचे स्पष्ट केले आहे.
सात दिवसानंतरही पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता - पुणे उद्योगपती गौतम पाषाणकर बेपत्ता अपडेट बातमी
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, 'सर्व शक्यता गृहीत धरून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पाषाणकर कुटुंबीयांनी काही संशयितांची नावेही कळवली आहेत. आम्ही त्यांचीही चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीत काहीही संशयास्पद निष्पन्न झाले नाही. गुन्हे शाखेची पाच पथके याप्रकरणाचा तपास करत आहेत.
![सात दिवसानंतरही पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता gautam pashankar an entrepreneur from pune still missing after seven days](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9332012-19-9332012-1603804943443.jpg)
तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईड नोट असल्याचे आढळून आले. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी त्यात लिहिले आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान पाषाणकर कुटुंबीयांनी त्यांचे सर्व म्हणणे पोलिसांना दिले आहे. या प्रकरणी जी काही मदत लागेल ती सर्व मदत करणार असल्याची माहिती पाषाणकर कटुंबीयांचे वकील प्रसाद कुलकर्णी यांनी दिले.
याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, 'सर्व शक्यता गृहीत धरून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पाषाणकर कुटुंबीयांनी काही संशयितांची नावेही कळवली आहेत. आम्ही त्यांचीही चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीत काहीही संशयास्पद निष्पन्न झाले नाही. गुन्हे शाखेची पाच पथके याप्रकरणाचा तपास करत आहेत.