पुणे -गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण शांततेत, उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पुण्यातील गणेशोत्सव ( Ganeshotsav in Pune ) कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पाहूयात.
Ganeshotsav In Pune : यंदा होणार निर्बंधमुक्त गणेशोत्सव...कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष - Corona Virus
गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामध्ये सर्व सण-उत्सव हे साजरे करण्यात आले नाहीत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सव ( Ganeshotsav ) , दही-हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळाना ( Ganeshotsav Mandal ) सहकार्य करण्यात येईल.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितल्यानंतर यंदा गणेशोत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहेत. गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी शासनाचे आभार मानत यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करू आणि तशी तयारी देखील मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.
गणेशोत्सव मंडळांत जल्लोष