पुणेपुणे मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ Ganeshotsav 2022 Pune, श्रींची आगमन मिरवणूक निघाली आहे. या वर्षी मिरवणूक मार्ग Ganeshotsav 2022 Pune 2022 उत्सव मंडप, फडके हौद चौक, देवाजी बाबा चौक, दारूवाला पूल, अपोलो थिएटर चौक मार्गे रास्ता पेठ पॉवर हाऊस रास्ता पेठ, पॉवर हाऊस चौकातून तसाच परत उत्सव मंडप असा आहे. Ganeshotsav 2022 Pune मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम पथक व वाद्यवृंद पथक सामील झाले मूर्तिकार श्री अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तुमधून निघून श्रींच्या मूर्तीचे आगमन उत्सवमंडपात होईल. श्रींची प्रतिष्ठापना सकाळी ठीक ११ वाजून ४५ मिनिटांनी संपन्न झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणा यांना मानवंदना म्हणून थोर क्रांतिकारक श्री राजगुरू यांच्या कुटुंबियांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होईल.
केसरीवाडा गणपतीकोरोनाच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणार उत्सव असतो. त्यातही मानाचे 5 गणपती हे विशेष महत्वाचे असतात. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा यांची प्राणप्रतिष्ठपणा 11 वाजून 42 मिनिटांनी मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात आधी श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तब्ब्ल 2 वर्षांनी वाजत गाजत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. Ganesh Chaturthi 2022 Celebrations मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकित तुफान गर्दी केली आहे. लोकमान्य टिळक यांनी यांनी या उत्सवाची सुरवात केली होती. यंदा या उत्सवाचे 129वे वर्ष आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची श्री ची आगमन मिरवणूक गेल्या 2 वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव होत असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. चांदीच्या पालखीत विराजमान होत असलेल्या मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या श्रीं च्या आगमनाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता नारायण पेठेतील न.चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून सुरवात झाली. कुंटे चौक, गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचली आहे. या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथक सहभागी झाले होते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता सन चौघडा व संबळच्या कर्णमधूर साथीत कॉसमॉस बँक चे अध्यक्ष व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त अनंत काळे व मीरा मिलिंद काळे यांच्या हस्ते होणार आहे.
श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट ची श्री ची आगमन मिरवणूक गेल्या दोन वर्ष सर्वच सण उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध मध्ये साजरा करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त सर्व सण उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव देखील निर्बंध मुक्त होत असून प्रत्येक मंडळ तसेच नागरिक आपापल्या बाप्पाच आगमन हे मोठ्या उत्साहात करत आहे. मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २.३० वाजता उद्योजक पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता श्रीं ची मिरवणूक गणपती चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक ते गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहचली आहे. या मिरवणुकीत शिवगर्जन समर्थ प्रतिष्ठान, उगम ही पथके सहभागी झाली आहे.
हेही वाचाGanesh Chaturthi 2022: गोदावरीच्या राजाची मुंबईवारी; मनमाड कुर्ला एक्सप्रेस मध्ये गणरायाची स्थापना