पुणे :राज्यभरात मोठ्या उत्साह आणि धुमधडाक्यात गणेश चतुर्थी ( Ganesh Chaturthi in full swing ) हा सण साजरा झाला. दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता झाली असून, अनंत चतुर्दशीला ( Anant Chaturdashi ) गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन ( Ganesh idol immersion ) करून पुढच्या वर्षी लवकर यावे अशी प्रार्थना केली गेली. गणेशोत्सवाच्या ( Ganeshotsav 2022 ) दहा दिवसांमध्ये शहरांमध्ये एकूण पाच लाख 52 हजार 432 मूर्तीचे विसर्जन करण्यात आला आहे. महापालिकेच्या मूर्ती संकलन व दान केंद्रात 85 हजार 993 मध्ये 54 हजार 703 लोखंडे टाक्यांमध्ये 2 लाख 1 हजार 447 बांधिव हौदामध्ये मध्ये 87 हजार 948 मूर्तीचे विसर्जन करण्यात आलं. ( Ganesh idol immersion in pune city )
Ganesh Visarjan 2022 : पुणे शहरामध्ये साडे पाच लाख गणेश मूर्तींचे विसर्जन.. 562 टन निर्माल्याचे संकलन - पुणे शहरामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन
राज्यभरात मोठ्या उत्साह आणि धुमधडाक्यात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi in full swing ) हा सण साजरा झाला. दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता झाली असून, अनंत चतुर्दशीला ( Anant Chaturdashi ) गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन ( Ganesh idol immersion ) करून पुढच्या वर्षी लवकर यावे अशी प्रार्थना केली गेली. गणेशोत्सवाच्या ( Ganeshotsav 2022 ) दहा दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन ( Ganesh idol immersion in pune city ) करण्यात आलं.
महापालिका प्रशासनाने काय केली व्यवस्था :गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने पहिला दिवसापासून विविध प्रकारच्या व्यवस्था तयार केल्या होत्या ,303 ठिकाणी विसर्जनाची सोय होती 150 फिरते विसर्जन होद होते 46 बांधीव हौद होते 360 लोखंडे टाक्या होत्या आणि 216 मूर्ती संकलन व दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. शेवटच्या दिवशी 3 लाख 10 हजार 158 मूर्तीचे विसर्जन झाले आहे. 562.6 टन निर्माल्य गोळा झाले. गेल्या वर्षीच्या विसर्जनाच्या संख्येपेक्षा 1 लाख 30 हजार हून अधिक मुर्त्या यावेळी विसर्जित झाले आहे.
विसर्जनादरम्यान कडेकोट बंदोबस्त संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये 48 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. पोलीस बंदोबस्तामध्ये कुठलीही कमतरता नव्हती. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार यावेळी घडलेला नाही. मानाच्या पाच गणपतीमध्ये थोड अंतर होतं परंतु त्याने आज काही फरक पडलेला नाही.