महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये 28 हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत होणार ५० हजार मूर्तीदान

संस्कार प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून मूर्तीदान व निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे. या वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवला असून, दुपारपर्यंत तब्बल २८ हजार मूर्ती दान स्वीकारण्यात आले आहे.

संस्कार प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून मूर्तीदान व निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे.

By

Published : Sep 12, 2019, 9:16 PM IST

पुणे- संस्कार प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून मूर्तीदान व निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे. या वर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवला असून, दुपारपर्यंत तब्बल २८ हजार मूर्तीदान स्वीकारण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचे संस्कार प्रतिष्ठानमधील मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

संस्कार प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून मूर्तीदान व निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी संस्कर प्रतिष्ठान, डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अन्य काही संस्था मिळून मूर्तीदान व निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम राबवत आहेत. गतवर्षी ४३ हजार मूर्तीदान झाल्या होत्या.

मूर्तीदान केलेल्या मूर्ती ट्रकमध्ये भरून शहरातील विनोद वस्ती येथील छोट्या तलावात विधिवत पूजा करून विसर्जित करण्यात येतात. यामुळे नदी प्रदूषण रोखण्यात काही प्रमाणात हातबार लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details