महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Ganesh Festival पुण्यात दणक्यात साजरा होणार गणेशोत्सव, जिल्हाधिकाऱ्यांनी हे काढले आदेश - Pune Ganesh Festival

सार्वजनिक गणेश मंडळाला गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन 4 ऐवजी 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर , साउंड,वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख Pune collector order for Ganesh Mandal यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Pune Ganesh festival
पुणे गणेशोत्सव

By

Published : Aug 18, 2022, 7:58 AM IST

पुणे पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे Ganesh Mandal Pune व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. त्यामुळे स्पीकर , साउंड वापरासाठी 4 ऐवजी 5 दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान sound speakers during Ganesh festival दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाला गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन 4 ऐवजी 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर , साउंड,वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख Pune collector order for Ganesh Mandal यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.स्पीकर , साउंड वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी 3 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, 7 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत एकूण 5 दिवस नियमांचे पालन करून स्पीकर , साउंड रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय केले होते आवाहनपुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो. त्यामुळे, आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे, यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच, कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे. कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते.

गणेशोत्सवात ध्वनीमर्यादेची सवलत - गणेशोत्सव कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी ध्वनीमर्यादेला ४ दिवसांची सवलत दिली होती. गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने गणेश मूर्तींबाबतचे निर्बंध काढून टाकल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विविध परवानग्याही एक‍ खिडकी पद्धतीने देण्यात याव्यात. मनपाने मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये. वीज मंडळांनी तात्पुरते वीजजोड देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, असे सांगून परवानग्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना चकरा माराव्या लागू नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी होते.

हेही वाचाKrishna Janmashtami जगातील सर्वात महागडा श्रृंगार, राधाकृष्णाला 100 कोटींच्या हिरे मानिकांनी सजवणार

ABOUT THE AUTHOR

...view details