पुणे उद्यापासून सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव हे साजरा होत आहे.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदीरे आहेत. तर सिद्धिविनायक मंदिराला देखील तेवढेच महत्त्व आहे. आज आपण 'अष्टविनायक' आणि 'सिद्धिविनायक' यामध्ये नेमका काय फरक difference Ashtavinayaka and Siddhivinayaka आहे, हे जाणून घेणार आहोत. अष्टविनायकाला स्वतंत्र इतिहास आहे. अष्टविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे राज्यात ही कुठेही पाहायला मिळत नाहीत. तर सिद्धिविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे हे राज्यभर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हा यातील एक मुख्य फरक आहे.Ganesh Chaturthi 2022
अष्टविनायक देवळेपश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे, त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांना मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे ,अशी गणेश भक्तांची भावना आहे.