महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gajanan Marne wife Join NCP : गुंड गज्या मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपाचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? - जयश्री मारणे राष्ट्रवादीत प्रवेश

मनसेच्या माजी नगरसेविका आणि गुंड गज्या मारणे (Gajanan Marne) याच्या पत्नी जयश्री मारणे (Jayashri Marne Join NCP) यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे .पुणे महानगरपालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी सारेच पक्ष कामाला लागलेले दिसत आहेत.

jayashri marne join ncp
जयश्री मारणे राष्ट्रवादीत प्रवेश

By

Published : Feb 16, 2022, 7:24 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:39 PM IST

पुणे - मनसेच्या माजी नगरसेविका आणि गुंड गज्या मारणे (Gajanan Marne) याच्या पत्नी जयश्री मारणे (Jayashri Marne Join NCP) यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे .पुणे महानगरपालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी सारेच पक्ष कामाला लागलेले दिसत आहेत. राष्ट्रवादीने तर आधीच भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार असा दावा केला होता. अजूनही १६ नगरसेवक १५ मार्चनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना जयश्री मारणे आणि प्रशांत जगताप
  • जयश्री मारणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नव्या वादाला तोंड -

दरम्यान, आज पुण्यातील राष्ट्रवादी शहर कार्यालयात मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण आता या त्यांच्या प्रवेशाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण जयश्री मारणे या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या पत्नी आहेत. गज्या मारणे हा सध्या मोक्का कारवाई अंतर्गत जेलमध्ये आहे. मात्र, आज पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यानंतर भाजप हा मुद्दा कसा उचलणार हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे गुन्हा हा त्यांच्या पतीवर आहे, त्यांच्यावर नाही असे सांगत प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Last Updated : Feb 16, 2022, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details