पुणे - दारु पिल्यानंतर झालेल्या वादतून दोघांनी एकाचा ( Pune Murder ) चाकूने गळा कापून खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री पुण्यातील जिल्हा परिषदेच्या जुन्या ( Murder Near ZP School ) इमारती समोरिल सार्वजनिक स्वच्छागृहासमोरील फुटपाथवर घडली. संजय असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच या प्रकरणी प्रभातकुमार कमलाकर म्हस्के, निलेश बाळासाहेब भोसले या दोघांना अटक केली आहे.
तिघंही मित्र -संजय, निलेश आणि प्रभातकुमार हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते मित्र असून तिघे मिळेल ती कामे करून फुटपाथवर राहतात. सोमवारी प्रभातकुमार याला केटरींगच्या कामाचे 1600 रुपये मिळाले होते. तिघांनी एकत्र येऊन रात्री दहा वाजता मद्यप्राशन केले. संजय याने पुन्हा दारु पाजण्याचा आग्रह केल्यामुळे परत मद्यप्राशन केले. त्यानंतर तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातून दोघांनी संजय याच्या गळा आंबा कापण्याच्या छोट्या चाकूने कापला. हत्या केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.