महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Murder In Pune :दोस्तीत झाली कुस्ती.. पहा नाना पेठ येथील हत्येमागील सत्य!

अक्षय वल्ल्याळ, किशोर शिंदे, महेश बोरा हे तिघेही नाना पेठ नवा वाडा येथ राहणारे जिगरी मित्र होते.म्हणतात ना मित्रा साठी काहीपण अशी त्यांची दोस्ती. एकत्र बसणे, फिरणे आणि मज्जा करणे अस या तिघांच्या दोस्ती चे किस्से. मात्र दहा महिन्यापूर्वी महेश आणि अक्षय यात किरकोळ वाद झाला आणि याच किरकोळ कारणावरून अक्षयने महेश च्या कानाखाली मारली. आणि येथूनच त्यांच्या मैत्रीत दरी आली आणि खून करण्यात आला.

Murder In Pune
Murder In Pune

By

Published : Jul 28, 2022, 2:24 PM IST

पुणे -मंगळवारी मध्यरात्री पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली (friend killed friend ) होती. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिशय भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. एकूणच ही घटना का घडली. यामागील कारणे काय आहे हे जाणून घेऊया ..

कानाखाली मारल्याच्या रागातून खून -अक्षय वल्ल्याळ, किशोर शिंदे, महेश बोरा हे तिघेही नाना पेठ नवा वाडा येथ राहणारे जिगरी मित्र होते..म्हणतात ना मित्रा साठी काहीपण अशी त्यांची दोस्ती..एकत्र बसणे, फिरणे आणि मज्जा करणे अस या तिघांच्या दोस्ती चे किस्से... मात्र दहा महिन्यापूर्वी महेश आणि अक्षय यात किरकोळ वाद झाला आणि याच किरकोळ कारणावरून अक्षयने महेश च्या कानाखाली मारली. आणि येथूनच त्यांच्या मैत्रीत दरी आली.

दोस्तीत झाली कुस्ती

मनातला राग हा टोकाला गेला -त्यानंतर भेटेल तिथे एकमेकांकडे रागाने पाहणे. विचारांशी एकमत न होणे. असे प्रकार दोघांमध्ये होत होते. त्यांच्यातील दुश्मनी वाढत होती. अक्षयची प्रतिमा मित्रपरिवारामध्ये चांगली होती. कोणाच्याही हाकेला धावणारा म्हणून अक्षयची ओळख होती. नाना पेठ येथील नवा वाडा येथे राहणारे यांचे अनेक मित्र हेअक्षयलाच प्राधान्य द्यायचे.आणि हेच वर्चस्व किशोरला वारंवार खटत होते. आणि यातूनच वाढत असलेला मनातला राग हा टोकाला गेला.

अक्षयच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी -तसे पाहिले गेले तर मृत अक्षय आणि आरोपी महेश यांच्यावर आधी छोटे मोठे गुन्हे दाखल ( crimes filed against Akshay ) आहेत. मात्र दुसरा आरोपी किशोर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. असे असताना एका दिवस अक्षयचे आता खूप झाले त्याचा कटा काढायचा असे महेश आणि किशोर यांनी ठरवले. आणि मग 27 तारखेच्या रात्री अक्षय आणि त्याचे काही मित्र नेहेमीच्या ठिकाणी कट्ट्यावर बसले होते. तिथे किशोर आणि महेश नेहेमी प्रमाणे आले काही कारणावरून किशोरने अक्षयसोबत वाद घालायला सुरवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पहिला आरोपी महेशने खिशातून चाकू काढला आणि अक्षयवर सपासप 35 वार केले. ही दुश्मनी एवढ्या टोकाला गेली होती की फक्त वार करून ते थांबले नाहीत. किशोरने मोठा दगड उचलून अक्षयच्या डोक्यात घातला ( picked up big stone head ). यातच अक्षयचा मृत्यू झाला. मात्र दोन मित्रांची मनातली कुजबुज ही त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी किशोर शिंदे ,महेश बोरा यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा -Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details