पुणे:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात ( Amrit Mahotsav of Freedom ) साजरा केला जात आहे. त्याचंच औचित्य साधून पुण्यातील सगळ्या वारसा स्थळांवर विनामूल्य प्रवेश मिळणार ( free entry to historical places in pune ) आहे, असे भारतील पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे ( Archaeological Survey of India Division decision ) सांगण्यात आले आहे.
पुण्यात ऐतिहासिक स्थळांवर मोफत प्रवेश -5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत पुढील दहा दिवस तिकीट न काढता प्रवेश मिळणार आहे. यासोबतच लोकसहभाग असलेले अनेक कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येणार आहे. शनिवार वाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस, लोणावळ्यातील कार्ला-भाजा लेणी, लेण्याद्री, लोहगड आणि शिवनेरी या सगळ्या वारसा स्थळांवर विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील सर्वच ऐतिहासिक वास्तूतळावरती याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येत आहे. आजपासून नागरिक मोफत प्रवेश करून शनिवार वाडा पाहू शकणार आहेत. पुण्याच्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणीसुद्धा मोफत प्रवेश दिला जाणार आहे.