दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील राहु येथे यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने ४ गावठी पिस्टल, १ रिव्हाल्वर, १३ काडतुसे जप्त केली आहेत .या प्रकरणी पाच जणांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी माहिती दिली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी अवैद्य बेकायदेशीर शस्त्रावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस स्टेशनला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
दौंड तालुक्यातील राहु येथून ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्वर आणि १३ काडतुसे जप्त - yavat police station
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी अवैद्य बेकायदेशीर शस्त्रावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस स्टेशनला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
माहितीच्या आधारे कारवाई -
पोलिसांचे पथक राहु परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार निलेश कदम व गुरूनाथ गायकवाड यांना बातमी मिळाली की, गावाच्या हद्दीतीलपाण्याच्या टाकीजवळ दिनेश महादेव मोरे व अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल जवळ बाळगत आहे. त्यानुसार ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्वर, १३ काडतुस जप्त करण्यात आली. तर दिनेश महादेव मोरे, अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे, अमोल शिवाजी नवले, सचिन शिवाजी चव्हाण, परमेश्वर दथरथ कंधारे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकुण २ लाख ९१ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.