पुणे: उधार घेतलेल्या सिगारेटचे पैसे न दिल्याने पुन्हा सिगारेट देण्यास नकार दिल्याने 4 जणांनी पान टपरीवर दगडफेक (Attack on Panthela Owner Pune) केली. पानटपरी चालकाच्या मुलावर कोयता व पालघने वार (hit him on head with sharp weapon) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न () केला. याप्रकरणी ओमप्रकाश विद्याधर शुक्ला (वय ४७, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन चौघा टोळक्यांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) (Latest News from Pune)
Attack on Panthela Owner Pune : सिगारेटचे पैसे न देता चौघांची पान टपरीचालकावर दगडफेक; घातक शस्त्रांनी चढविला हल्ला
उधार घेतलेल्या सिगारेटचे पैसे न दिल्याने पुन्हा सिगारेट देण्यास नकार दिल्याने 4 जणांनी पान टपरीवर दगडफेक (Attack on Panthela Owner Pune) केली. पानटपरी चालकाच्या मुलावर कोयता व पालघने वार (hit him on head with sharp weapon) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न () केला. याप्रकरणी ओमप्रकाश विद्याधर शुक्ला (वय ४७, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन चौघा टोळक्यांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) (Latest News from Pune)
डोक्यात कोयता व पालघनने वार -हा प्रकार येरवड्यातील गांधीनगर कॉर्नरवरील शिवशक्ती पान शॉप या दुकानात ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश शुक्ला यांची शिवशक्ती पान शॉप ही पानटपरी आहे. त्यांच्या पान टपरीत येऊन चौघे मुले सिगारेट घेऊन जात पैशांची मागणी केल्यावर शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी देत. हे 4 जण 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आले. त्यांनी पैशाशिवाय सिगारेट देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पानटपरीवर दगडफेक करुन पळ काढला. त्यानंतर साडेसात वाजता पुन्हा आले. फिर्यादी यांचा मुलगा अनुराग शुक्ला यांच्या डोक्यात कोयता व पालघनने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.