पुणे - राज्यासह पुण्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. मागील पंधरा दिवसांत एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे.
कोरोनाने संपवल संपूर्ण कुटूंब, एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू
पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे का, पुणे महापालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह परिवारातील चौघांचा मागील पंधरा दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने कुचेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. पुणे महापालिका आरोग्य सेवेत श्यामसुंदर कुचेकर आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली. यात श्यामसुंदर यांचे वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर, भाऊ विजय कुचेकर यांना कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात भीतीचेही वातावरण पसरले आहे.
हेही वाचा -तमाशा कलावंत दत्ता महाडिक यांच्या संपूर्ण कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ