पुणे - काळाची गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदिर साकार होणार आहे. शिवाय शहराची अस्मिता असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
माहिती देताना माजी महापौर मुरलीधर मोहोळ हेही वाचा -प्लम्बिंगचे साहित्य चोरणाऱ्यास सहकारनगर पोलिसांकडून अटक
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन या प्रकरणी सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले की, आपल्या शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 54 वर्षांपूर्वी लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि देखरेखीखाली हे रंगमंदिर उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एक तरी संधी बालगंधर्व रंगमंदिराला मिळावी, असे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला नव्याने उभारणी आणि व्यापक करण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन हा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
हेही वाचा -Mango Masti competition Pune : स्पर्धेच्या माध्यमातून दृष्टिहीन मुलांनी घेतला आंब्यांचा आस्वाद; जिंकले आकर्षक बक्षिसे
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना त्यात व्यापार संकुल असेल, असा अपप्रचार काहींकडून जाणीवपूर्वक केला जात असून, यात काडीचेही तथ्य नाही. केवळ विरोधाला विरोध म्हणून हा खोटा प्रचार केला जात आहे. कारण या पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिकरणासाठी नसेल, असेही माजी महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.