पुणे- आगामी गणेशोत्सवासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात 3295 नव्या सार्वजनिक गणपती मंडळांनी परवानग्या घेतल्या असून हायकोर्टाच्या नियमावली नुसार या परवानग्या देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक मंडळाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षणही देण्यात आले.
पुणे : गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज,२८ हजार ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ठेवणार नजर
गणेशोत्सवासाठी शहरात 5500 पोलीस, 700 होमगार्ड, 2 एसआरपीएफ टीम तैनात असतील. तर सी वॉचच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालय अंतर्गत व खाजगी मिळून 28 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून पोलीस नजर ठेवणार आहेत. न्यायालयाच्या नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याची दखल मंडळांनीही घेण्यासाठी मंडळ व नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहरात 5500 पोलीस, 700 होमगार्ड, 2 एसआरपीएफ टीम तैनात असतील. तर सी वॉचच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालयाअंतर्गत व खाजगी मिळून 28 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून पोलीस नजर ठेवणार आहेत. दरम्यान, ढोल पथकांसाठीची नियमावलीही कडक करण्यात आली असून 40 ढोल, 6 ताशे असे 100 लोकांचे पथक असावे. प्रत्येक मंडळात दोनहून जास्त पथक नसावेत. मानाच्या गणपतींना मात्र यात सुट देण्यात येऊन त्यांना तीन पथक वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलीसांच्या म्हणण्यानुसार या नियमावलीला ढोल-ताशा पथकांकडूनही चांगला प्रतिसाद देण्यात आला. गणेश मंडळांना डॉल्बी सिस्टीम वापरता येणार नसून साऊंड सिस्टीम वापरावी लागणार आहे. कारण मर्यादेपेक्षा जास्त आवाजाला परवानगी नसल्याने न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार आवाज करावा. न्यायालयाच्या नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याची दखल मंडळांनीही घेण्यासाठी मंडळ व नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले.