पुणे -वंचित विशेष चिमुकल्यांना मामाच्या गावाची मजा अनुभविता यावी, याकरीता मामाच्या गावची सफर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. मात्र, याहिवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ३५० वंचित-विशेष मुलांना येथे येऊन या सफरीचा आनंद घेता येणे शक्य नसल्याने त्यांना सर्व प्रकारचे धान्य आणि तब्बल २० प्रकारचा खाऊ, फळे त्यांना त्यांच्या संस्थेत मामांकडून पाठविण्यात आले.
सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे ७ संस्थांमधील मुलांना मदत
शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेवा मित्रमंडळ गणपती मंदिरात हे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुपूर्द करण्यात आले. सुषमा सावंत सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर तसेच विशाल घोडके स. कामगार आयुक्त यांच्या हस्ते या संस्थांना देण्यात आले. यावेळी मंडळाचे शिरीष मोहिते, आनंद सराफ, आदी उपस्थित होते. आपले घर, लू ब्रेल अंध-अपंग कल्याणकारी संस्था, एकलव्य न्यास, संतुलन पाषाण, ममता फाऊंडेशन, माहेर, बचपण फोर वर्ल्ड अशा या सात संस्थांमधील मुलांना मदत करण्यात आली आहे.