पुणे - हवामान बदलामुळे देशाला अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. या गंभीर विषयावर केंद्र सरकार राज्याशी समन्वय साधून लवकरच नवे धोरण करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पूर-दुष्काळ हे हवामान बदलाचे परिणाम, यावर लवकरच नवे धोरण आखणार - प्रकाश जावडेकर - प्रकाश जावडेकर
चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसाठी केंद्र सरकारने जी पेंशन योजना आणली आहे, ती नक्कीच फायद्याची ठरेल. यासाठी, 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ'ने पुढाकार घेऊन सर्वांच्या पेन्शनची कामे पूर्ण करून घ्यावीत.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की चित्रपट निर्मिती क्षेत्रात अनेक लोक काम करतात, ते असंघटित आहेत. या सर्वांसाठी केंद्र सरकारने जी पेंशन योजना आणली आहे, ती नक्कीच फायद्याची ठरेल. यासाठी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेऊन सर्वांच्या पेन्शनची कामे पूर्ण करून घ्यावीत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन द्यावे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. असेही जावडेकर यावेळी म्हणाले.
याप्रसंगी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद तसेच नामवंत चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, टेक्निशियन, निर्माते व दिग्दर्शक उपस्थित होते.