पुणे -राज्यात मागच्या गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. पुण्यासहअनेक ठिकाणी झालेल्या पावसाच्या सरींसोबतच सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसून आली आहे. पुणेकर गारठून गेले असून सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. शहरावर धुक्याची चादर ( Low Visibility At Pune Due To Fog ) पसरली आहे. दाट धुक्यामुळे विमानांची उड्डाणे ( Flights Delayed Due To Fog ) लांबली आहेत.
Flights Delayed Due To Fog : गुलाबी थंडीत पुणेकर गारठले; तर दाट धुक्यामुळे विमानांची उड्डाणे लांबली
पुणे शहरावर धुक्याची चादर ( Low Visibility At Pune Due To Fog ) पसरली आहे. दाट धुक्यामुळे विमानांची उड्डाणे ( Flights Delayed Due To Fog ) लांबली आहेत.
शहरात धुक्याचं (Fog) प्रमाण जास्त असल्याने परिणामी दृष्यमानता कमी झाली होती. याचा परिणाम वाहुतकीला झाला असून विमानांची उड्डाणे काही तासाने लांबली आहेत. आज सकाळी पुण्यात एअरपोर्ट वर दृश्यमानता 100 मीटर होती. त्यामुळे पुढील काही तास विमानसेवा विस्कळीत राहील अशी माहिती पुणे विमानतळाकडून ( Pune Airport )देण्यात आली आहे.
आज पहाटेपासून पुण्यात गुलाबी थंडी आणि दाट धुके पाहायला मिळाले. महामार्गावर वाहन चालकांना काहीशी कसरत करावी लागल्याचे आज पाहायला मिळाले. दाट धुक्यामुळे वाहनांचे हेडलाईट देखील निकामी ठरले. त्यामुळे, काही वेळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान, धुक्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी गुलाबी थंडीमुळे पुण्यात पर्यटनात वेग येईल, अशी आशा आहे. तसेच या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.