महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खडकवासला धरणातून 5 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी खडकवासला धरणातून पून्हा पाण्याचा विसर्ग सूरू करण्यात आला आहे.

By

Published : Jul 29, 2019, 11:50 PM IST

खडकवासला धरणातून 5 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

पुणे -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर खडकवासला धरणातून 5 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.

खडकवासला धरणातून 5 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी संपूर्ण ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. यातून रविवारी पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजेनंतर खडकवासला धरणातून 5 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मुठा नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details