पुणे- पुण्याचे वैभव असलेल गणेशोत्सव मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यंदाही साध्यापणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आले असून रविवारी (दि. 19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन दुपारी दीड वाजण्याच्या आत करण्यात आले. एखादी घटना वगळता सर्वच मानाच्या गणपती मंडळांनी यंदाही कोरोनाचे नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आले.
कसबा गणपतीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा पाहिला श्री कसबा गणपती मंडळाच्यावतीने सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्तर पूजा करण्यात आली. 129 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांच्या हस्ते कसबा गणपतीची उत्तर पूजा करण्यात आली. त्यानंतर सभा मंडपातून थोड्याच अंतरावर पालखीने मिरवणूक काढण्यात आली. साडे आकरा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
श्री तांबळी जोगेश्वरी गणपतीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास विसर्जन
मानाचा दुसरा श्री तांबळी जोगेश्वरी मंडळाच्यावतीने देखील मंडळाच्या बाहेर हौदातच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पूजा करुन साडे अकरा वाजता विसर्जन करण्यात आले. तांबळी जोगेश्वरी मंडळाच्या वतीने हे पालखीत आणून थोड्याच अंतरावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
गुरुजी तालीम मंडळ गणपतीचे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास विसर्जन