महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात कोरोनाने हिरावले पाच दिवसाच्या बाळाचे मातृछत्र

बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे अशाप्रकारे मातृछत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

corona in pune
corona in pune

By

Published : May 19, 2020, 7:47 AM IST

Updated : May 19, 2020, 2:54 PM IST

पुणे- ससून रुग्णालयात एका 20 वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून हे बाळ सुखरूप आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे अशाप्रकारे मातृछत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हडपसर परिसरातील ही महिला महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. 13 मे ला सिझेरियनद्वारे तिची प्रसूती करण्यात आली. यावेळी तिची आणि नवजात बाळाची तब्येत चांगली होती. त्यानंतर या महिलेची प्रकृती हळूहळू खालावत गेली. 15 मे रोजी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या महिलेला किडनी आणि हृदयाचा आजारही होता. प्रसूतीनंतर तिचे प्लेटलेट्सही कमी होत गेले. अखेर उपचार सुरू असताना रविवारी (17 मे) सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

Last Updated : May 19, 2020, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details