पुणे- सोमवारी दिवसभरात नव्याने कोरोनाबाधित तब्बल 91 रुग्ण आढळले असून पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 573 इतका झाला आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 5 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
पुण्यात सोमवारी दिवसभरात सर्वाधिक 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, 91 नवे रुग्ण - कोरोना व्हायरस इन पुणे
पुण्यात आजवर 2 हजार 573 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील 149 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर बऱ्या झालेल्या 1089 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 1 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील एकूण मृतांचा आकडा 149 वर जाऊन पोहोचला आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी पुणेकरांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, अजूनही 98 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. याशिवाय कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या 69 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
पुण्यात आजवर 2 हजार 573 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील 149 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर बऱ्या झालेल्या 1 हजार 89 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 1 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.