पुणे -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( ST Electric Bus Start ) इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाची पहिली ( State Transport E Bus ) ई-बस 1 जून रोजी पुणे ते अहमदनगरला ( Pune To Ahmednagar First Electric Bus ) रवाना होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या शिवाई बसचे उदघाटन होणार आहे.
पुणे ते नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक -दरम्यान, बीएसआरटीसीची ( बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ) पहिली बस 1 जून 1948 पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती. त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तात अहमदनगरमधील माळीवाडा बस स्थानक ते पुणे अशी बस नेण्यात आली होती. आता एसटी महामंडळाने क्रांतिकारी पाऊल उचलत 75व्या वर्धापन दिनी याच मार्गावर म्हणजेच पुणे ते नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 ईलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात -या बससाठी महामंडच्या विभागीय कार्यालय येथेच उभारण्यात येत असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. पीएमपीप्रमाणेच आता एसटीच्या ताफ्यातदेखील इलेक्ट्रिक गाड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 2 इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, 1 जूनपासून एसटीच्या या गाड्यामधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
काय आहे वैशिष्ट्य -राज्यात जी पाहिली एसटी महामंडळाची ई-बस धावणार आहे. त्या ई-बसच्या आतमध्ये 2 कॅमेरे, बाहेर 1 कॅमेरा, त्याच्या निरीक्षणासाठी चालकाच्या आसनाशेजारी छोटा एलईडी, संपूर्ण वातानुकुलित बस, 10 हून अधिक बॅटरी ज्या एका चार्जमध्ये 200 ते 250 किमी धावणार, तसेच चालकाच्या शेजारी एक डिव्हाइस जो चालकावर नियंत्रण ठेवणार, अशी अत्याधुनिक सुविधा असलेली इलेक्ट्रिक बस पुण्याच्या विभागीय कार्यालयात धावण्यासाठी सज्ज झाली असून 1 जून पासून पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावणार आहे.