पुणे- लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विमान वाहतूक बंद होती. मात्र आता सरकारने विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असून पुण्यात आज सकाळी दिल्लीहून पहिली फ्लाईट दाखल झाली. या फ्लाईटमधून 23 प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत.
कोरोना इफेक्ट; आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू, पहिलीच फ्लाईट पुण्यात दाखल
देशांतर्गत विमानसेवेच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरणाने विमान उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पुण्यातून 17 उड्डाणे होणार आहेत. दरम्यान आज पुण्यात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच आज पुण्यात विमान दाखल झाले.
केंद्र सरकारच्या देशांतर्गत विमानसेवेच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरणाने विमान उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पुण्यातून 17 उड्डाणे होणार आहेत. दिल्ली, बंगळूरु, अहमदाबाद, कोची, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद याठिकाणी ही उड्डाणे होणार आहेत. आजपासून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली होती.
याबाबत कित्येक राज्यांनी आक्षेप घेतला होता, तर काहींनी आणखी मुदतवाढ मागितली होती. या सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक आजपासून सुरू झाली आहे.