पुणे -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश ( Pimpari Chinchwad CP Krushna Prakash ) हे विराजमान होताच, चुकीचं वागल्यास राजकारण्यांची गय केली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड हे गुन्हेगारी मुक्त आणि भयमुक्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी केला होता. मात्र, त्यांचा या संकल्पनेला तडा गेल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. एका तडीपार गुंडाने वर्दळीच्या ठिकाणी सराईत गुन्हेगारावर बेछूट गोळीबार ( Pimpari Chinchwad Firing ) केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या काटे पुरम चौकात (Katepuram Chauk Firing ) घडली. या गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा ( Death In Pimpari Chinchwad Firing) मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची भीती गुन्हेगारांमध्ये राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
- पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट -
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तडीपार गुंड गणेश मोटे, आश्विन चव्हाण या दोघांनी फिल्मीस्टाईलने भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी योगेश राजेंद्र जगताप याच्यावर तब्बल दहा गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. यातील आरोपी गणेश मोटे हा तडीपार होता. त्यामुळे सांगवी पोलिसांच्या कामगिरीवरदेखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेतील दोन्ही आरोपी फरार आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळी भेट दिली.
- वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार -
काटे पुरम चौकात नेहमी वर्दळ असते, शनिवारी दत्त जयंती असल्याने अनेक भाविक त्या ठिकाणी येत होते. अशा वेळी नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी योगेश जगतापची हत्या करून तडीपार गुंड गणेश मोटे याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. एकीकडे शहरात वाहनांची तोडफोड होत आहे. पिंपरीतील खराळवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी 6-7 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी गुंडांच्या भीतीने नागरिक तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यामुळे शहरात घडत असलेल्या सततच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
- वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्तांचे ऐकत नाहीत? -