पुणे - हिंजवडीतील माणमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
व्हेरॉक लायटिंग सिस्टिम प्रा.लि. कंपनीत सहाशेहून अधिक कामगार काम करतात. रात्रीच्या वेळी काम करत असताना आग लागली. वेळीच कामगार बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हिंजवडीतील माणमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती देखील स्थानिकांना देण्यात आली.
हिंजवडी फेज दोनमध्ये व्हेरॉक ही कंपनी आहे. या कंपनीला पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि आगीने उग्र रूप धारण केले. पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी एमआयडीसी तसेच पुणे पीएमआरडीएच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल चार तासांनी आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले आहे.