पुणे - पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या मारुती सुझुकी सेंटर या दुकानात रविवारी पहाटे भीषण आग लागली. अंदाजे 40 हजार स्क्वेअर फूट असलेल्या या दुकानात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत आगीने बरेच नुकसान झाले होते. या आगीची झळ काही नव्याकोऱ्या गाड्यांना देखील बसली आहे. पहाटेपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाही.
गोडावूनालाही आग
मुंढवा परिसरात आगीच्या दोन घटना, मारुती सुझुकी सेंटर आणि गोडवूनला भीषण आग - Maruti center fire in Mundhava
मुंढवा परिसरात रात्री दोन ठिकाणी आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही आगी विझवण्यात आल्यात.
मुंढवा परिसरात आगीच्या दोन घटना, मारुती सुझुकी सेंटर आणि गोडवूनला भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत मुंढव्यातीलच एका फर्निचरच्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. सात ते आठ हजार स्क्वेर फूट असलेल्या या गोडवूनमध्ये स्क्रॅप मटेरियल होते. या स्क्रॅप मटेरियलला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीच्या दोन्ही घटनांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवित हानी झाली नाही किंवा कुणी जखमीही झाले नाही.