पुणे -जिल्ह्यातील कासुर्डी गावात कार केअर प्रोडक्ट्स कंपनीच्या उत्पादन युनिटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या असून आग आटोक्यात आली असल्याची माहिती पुणे अग्निशमन विभागाने दिली आहे. तसेच आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
आग लागलेली पेंटिंग केमिकल कंपनी असल्याने आगीचे प्रमाण अधिक होत. त्यामुळे परिसरात बराच वेळ धुराचे लोटचं लोट पसरलेले पाहायला मिळत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अजूनही अग्निशामक दलाकडून चालू आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचं देखील समजत आहे.