पुणे - मुसळधार झालेल्या पावसामुळे कोंडव्यातील जुना रिकामा वाडा पडल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे बाजिच्या घरातील 11 नागरिक मलब्याखाली दबले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Old Building Collapse : पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली; तीन घरातील 11 नागरिकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले बाहेर - पुण्यात जुन्या वाड्याची भींत कोसळली
पुण्यातील कोढव्यात जुन्या वाड्याची भींत बाजुच्या घरावर पडून 11 नागरिक दबले होते. मात्र या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य करत सुखरुप बाहेर काढले आहे.
पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली
जुन्या वाड्याची भिंत कोसळली बाजूच्या घरावर -गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक सोसायटी तसेच घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाणातील दत्त मंदिरासमोर आज जुन्या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्याने इतर तीन घरातील ११ रहिवाश्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी व जीवितहानी झालेली नाही.
Last Updated : Jul 14, 2022, 11:49 AM IST