पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथे संगणक दुकानाला भीषण आग लागली आहे. यात झोपलेल्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. अंकित अनिल अगरवाल (वय 27) असे मृत्यू झालेल्या कामरागाचे नाव असून तो मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. दरम्यान, संगणक दुरुस्ती आणि झेरॉक्सचे दुकान हे एकत्रच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी यमुनानगर येथे आज सकाळी सातच्या सुमारास संगणक दुरुस्ती करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत दुकानात झोपलेल्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दहा लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.