महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Katraj Cylinder Blast : कात्रज येथे झालेल्या सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल - कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण

पुण्यात कात्रज येथे झालेल्या सिलेंडर स्फोटा प्रकरणी (Katraj Cylinder Blast) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे काल सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाले होते.

Katraj Cylinder Blast
Katraj Cylinder Blast

By

Published : Mar 30, 2022, 2:52 PM IST

पुणे - पुण्यात कात्रज येथे झालेल्या सिलेंडर स्फोटा प्रकरणी (Katraj Cylinder Blast) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे व्यवसाय करणारा व्यवसायिक सागर पाटील त्याचबरोबर सदर जागेचा मालक याच्यासह आणखीन दोन जणांवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास १६७ सिलेंडर पोलीसांनी केले जप्त-४३६, ३०८, २८५ या तीन कलमाअंतर्गत या चौघांवर गुन्हा दाखल झाली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.अनधिकृत रित्या सिलेंडरचा साठा करणे यामुळें हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणाहून १४१ छोटे तर २६ मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम इथे चालत होते अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

काल झाले होते सिलेंडरचे २० स्फोट -पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे काल सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाले होते.या स्फोटमुळे सदरील गोडाऊनला आग देखील लागली होती. या गोडाऊन मध्ये जवळपास वीस सिलेंडरचा स्फोट एकदाच झाल्याने. आग मोठी भीषण होती. मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी काल झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच स्थानिकांचा मोठं नुकसान झालं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details