महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

FIR on Jiten Gajaria : रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट; जितेन गजारिया विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट (Tweet) केले होते. या प्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया (BJP Social Media Activist Jiten Gajaria) यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलीस स्टेशन (Pune Cyber Police) येथे गुन्हा दाखल झाला आहे.

By

Published : Jan 7, 2022, 2:13 AM IST

controversial tweets
जितेन गजारिया आणि रश्मी ठाकरे

पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट (Tweet) केल होते. या प्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया (BJP Social Media Activist Jiten Gajaria) यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलीस स्टेशन (Pune Cyber Police) येथे गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. कलम 153 अ, 500 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • काय आहे प्रकरण?

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. या ट्वीटवरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून भाजपवर टीका होत आहे. या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. आता या ट्वीटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता याबद्दल सायबर पोलीस तपास करत आहेत.

  • जितेन गजारिया याची मुंबई पोलीस सायबर सेलकडून चौकशी -

रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी जितेन गजारिया याची मुंबई पोलीस सायबर सेलकडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली. आक्षेपार्ह ट्विटच्या संदर्भात सायबर सेलच्या डीसीपी यांनी जितेन गजारिया याचा संपूर्ण जबाब नोंदवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details