महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात विसर्जन मिरवणुसाठी तब्बल ७ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात

गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

By

Published : Sep 11, 2019, 10:49 AM IST

डॉ . के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे

पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या सकाळी १० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीत तब्बल ७ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर बीडीडीएस सात टीम असणार आहे. त्याचबरोबर पाच शीघ्र कृती दल, वज्र, वरून, पाच दंगल नियंत्रण पथक आणि सहा स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - गणेशोत्सव २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन मार्गावर 169 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये एकूण 377 बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला. त्याचबरोबर गणेश मंडळाच्या 30 हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मानाच्या गणपतीसमोर तीन ढोलपथक तर, इतर गणपतींच्या समोर दोन ढोल पथकांना परवानगी देण्यात आली आहे.

ढोल पथकातील एकूण सदस्यांची संख्या 100 पर्यंत ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली. गणेशोत्सवात आतापर्यंत बारा मंडळांवर ध्वनिप्रदूषण अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील १७ रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी इतर मार्गावरून ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड ही तयार करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details