'कळत नकळत' सिनेमाचे दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन
'कळत नकळत' या सिनेमाचे दिग्दर्शक कांचन नायक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'कळत नकळत', 'विषवनाथ' आणि 'एक शिंपी' या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
पुणे - 'कळत नकळत' या सिनेमाचे दिग्दर्शक कांचन नायक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कळत नकळत, घर दोघांचे यासारखे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले होते. तर 'विषवनाथ', 'एक शिंपी' हे त्यांचे लघुपट प्रदर्शित झाले होते. 'कळत नकळत', 'विषवनाथ' आणि 'एक शिंपी' या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
कांचन नायक यांनी कारकीर्दीची सुरुवात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि जब्बार पटेल यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. सिनेमा दिग्दर्शनानंतर त्यांनी मालिका आणि लघुपटात नशीब आजमावले. तसेच काही जाहिरातींचे देखील दिग्दर्शन केले. त्यांच्या जाण्याने सहृदयी मात्र शिस्तीचा दिग्दर्शक गमावल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.