पुणे - पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात 15 महिलांचा समावेश आहे, तर 3 पुरुषांचा समावेश आहे.
हेही वाचा -'घरात एकटीच करता धरता होती ओ..आता काय करायचं'.. मुळशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाची आर्त हाक
18 कामगारांचा होरपळून मृत्यू -
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता कंपनीच्या मालकाविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज घटनास्थळी अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारने कालच जाहीर केली आहे. तर, या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा -'लोकांची ओळख पटवणे अवघड, डीएनए चाचणी करून तीन दिवसात मृतदेह ताब्यात देऊ'