पुणे- कन्नड विधानसभा मतदार संघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यावर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय 43) आणि ईशा बालाकांत झा (वय 37) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा
कन्नड विधानसभा मतदार संघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यावर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.
जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी आपल्या आई-वडिलांसह दुचाकीवरून औंधमधून ब्रेमेन चौकाकडे जात होते. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्या चारचाकी गाडीचा दरवाजा अचानकपणे उघडला. यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये अमन चड्डा यांच्या आई जखमी झाल्या. दरम्यान अचानकपणे दरवाजा का उघडला असा जाब विचारला असता, हर्षवर्धन जाधव यांनी चड्डा यांच्या आई- वडीलांना मारहाण केली. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्याविरोधात चड्डा यांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.