पुणे - राज्य महिला आयोगाच्या ( State Womens Commission ) अध्यक्षा ( Rupali Chakankar ) यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सोशल मीडियावर ( Social media ) टाकलेल्या पोस्टनंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यातील अनेक प्रतिक्रिया अर्वाच्च व अश्लिल भाषेत होत्या. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे ( Home Minister ) मागणी केली आहे की, कोणत्याही महिलेवर अश्लि टीका झाल्यास सायबर सेलकडून लगेच सुमोटो दाखल करावा. महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने या मुद्यावर अत्यंत गांभीर्याने पाऊल टाकल्याचे दिसत आहे.
चाकणकरांच्या पोस्टवरून वादंग - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये चाकणकर यांनी, 'लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही' असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या या फेसबुक पोस्टच्या खाली अनेक प्रतिक्रिया या अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत आल्या आहेत. या अश्लिल कमेंट करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाईला सुरवात झाली आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने सोशल मीडियावर महिलांना अश्लिल भाषेत ट्रोल केलं जात आहे. या विरोधात आता राज्य महिला आयोगाकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्याही महिलेवर अश्लिल टीका केल्यास सायबर पोलिसांकडून लगेच सुमोटो दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याचे महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहािती दिली.