महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

New TET Scam : टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीची पन्नास ओळखपत्रे

म्हाडाच्या पेपरफुटी प्रमाणेच टीईटी परीक्षेमध्येही घोटाळा ( New TET Scam ) झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. म्हाडा पेपरफुटीचा ( Mhada Paper Leak ) सूत्रधार असलेल्या रितेश देशमुखच्या घराची पोलिसांनी झडती घेतली ( Police raided Riteish Deshmukh house ) . त्यावेळी टीईटी परीक्षेची पन्नास ओळखपत्रं सापडल्याने ( 50 TET I Cards Found ) खळबळ उडाली आहे.

टीईटीचा नवीन घोटाळा
टीईटीचा नवीन घोटाळा

By

Published : Dec 16, 2021, 11:07 AM IST

पुणे - म्हाडाच्या होणाऱ्या परीक्षेच्या पेपरफुटी ( Mhada Paper Leak ) प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून ( Pune Cyber Police ) म्हाडा पेपेरफुटीचा सूत्रधार जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ( G A Software Technology ) या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख, अंकुश रामभाऊ हरकळ, संतोष हरकळ यांना अटक करण्यात आलेली आहे. जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. रितेश देशमुख याच्या घरी झाडाझडती केली असता, टीईटीचे पन्नास ओळखपत्र सापडल्याने टीईटीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीचे पन्नास ओळखपत्रे
टीईटी परीक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताजी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रितेश देशमुख याच्या घराची पुण्याच्या सायबर गुन्हे शाखांकडून घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या लॉकरची देखील घडती घेण्यात आली आहे. या झडतीत पुणे पोलिसांना टीईटीचे पन्नास ओळखपत्र सापडले आहेत. त्याच पद्धतीने टीईटीच्या चाळीस अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहे. पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती परीक्षामहाटीईटी परीक्षा ( Maha TET Exam ) 21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात आली होती. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीसाठी अर्ज केलं होतं. तर, काही विद्यार्थी एकाच पेपरला अर्ज करतात. परीक्षेनंतर प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता.

ABOUT THE AUTHOR

...view details