महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक ! तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्याभरात वडिलांचा खून

तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्या भरात वडिलांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे.

Father murdered by a 13-year-old boy in Pune
धक्कादायक ! तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्या भरात वडिलांचा खून

By

Published : May 20, 2021, 8:14 PM IST

पुणे - भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने रागाच्याभरात स्वतःच्या वडिलांचा चाकू भोसकून खून केला. गुरुवारी ही घटना घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. दस्तगीर (वय 38) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मृत दस्तगीर हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्या मुलात आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून दस्तगीर यांनी या मुलाला मारहाण केली होती. याच रागातून मुलाने घरातील चाकूने वडिलांच्या पोटावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दस्तगीर यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details