महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Accident पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात 5 जणांचा जागीच मृत्यू - terrible accident

पुणे अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला

Pune Accident
Pune Accident

By

Published : Aug 17, 2022, 8:03 AM IST

Updated : Aug 17, 2022, 8:54 AM IST

पुणे पुणे अहमदनगर महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. रस्ता सोडून राँग साईडने आलेला ट्रक अचानक रोडच्यामध्ये आल्याने कारची धडक झाली. आणि गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.

पनवेलला जाण्यासाठी निघाले -बुधवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला असून कॅटेनर चालक उलट साईडने आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. रांजणगाव एमआयडिसीतील एल जी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्या अगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

अपघातात गंभीर जखमी -अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के वय 53, राम भाऊसाहेब म्हस्के वय 45, राम राजू म्हस्के वय 7, हर्षदा राम म्हस्के वय 4 वर्ष, विशाल संजय म्हस्के वय 16 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा -Gondia Accident गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात 50 हून अधिक जखमी

Last Updated : Aug 17, 2022, 8:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details