पुणे - शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळाल्या. या आगीत शंभर ते दोनशे दुकाने जळून भस्मसात झाल्याची शक्यता आहे. मध्यरात्री एक वाजून सहा मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
पुण्यात फॅशन स्ट्रीटला भीषण आग, दोनशे पेक्षा जास्त दुकाने जळाली - शहरातील कॅम्प परिसरात भीषण आग
शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली होती. ही आज दिवसभरातील तिसरी आगीची घटना आहे.
पुण्यातील फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी इमारतीने वेढलेले आहे. या फॅशन स्ट्रीटमध्ये जाण्यासाठी छोटीशी वाट आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग लागली त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे होते. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो नागरिक या ठिकाणी दाखल झाले आहेत. यामुळे आग विझविण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचण होत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या, दहा अधिकारी आणि 50 हून अधिक जवान सलग दोन तास अथक प्रयत्न करत होते.