पिंपरी-चिंचवड/मावळ- केंद्र सरकारने रासायनिक खतांचे दर वाढविल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अगोदर निसर्ग चक्रीवादळ त्यात अवकाळी पाऊस आणि पुन्हा तौक्ते वादळामुळे मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
हातातोंडाशी आलेला घास वादळ वारे, पावसाने हिरावून घेतला तर दुसरीकडे केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी शेतकरी संघटनेने जुना मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणे फाट्यावर केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून आक्रोश जन आंदोलन केले आहे.