पुणे -केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ( UPSC Exam Final Result 2021 ) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. राज्यातील 80 हुन अधिक विद्यार्थी हे या यूपीएससीत उत्तीर्ण झाले असून सुरुवातीला पुण्यात तयारी आणि लॉकडाऊनपासून गावातच तयारी करणाऱ्या ओंकार पवार या शेतकऱ्याच्या मुलाने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावातील ओंकार पवार याचे प्राथमिक शिक्षण हे सनपानेच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले असून पुढील शिक्षण पुण्यात झाले. ओंकार पवार याने मागील वर्षी यूपीएससीच्या या परिक्षेत 455 नंबरने उत्तीर्ण होऊन आयपीएस पदावर तो सध्या रुजू आहेत. गेल्या 2 वर्षात ओंकार याने गावातच राहून यूपीएससीची सर्व तयारी केली आहे.